धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त | पुढारी

धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या ; 199 बाटल्या जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या एकास धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने बंड्या ठोकल्या आहे. या गुन्हेगाराकडून एका बॅगमध्ये गुंगीकारक औषधांच्या 199 बाटल्या आढळून आल्या आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील संतोषी माता चौकात गुंगीकारक औषधांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी या चौकामध्ये सापळा लावला. यावेळी अझरुद्दीन शेख रफीयोददीन शेख हा युवक त्याच्या बॅगसमवेत संशयित हालचाली करत असल्याचे आढळून आले. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगची तपासणीत त्यातून औषधाच्या 199 बाटल्या आढळून आल्या. हा औषधाचा साठा त्याने जायचा मळा भागात राहणारी मिराबाई नामक महिलेसाठी आणल्याची माहिती उघड झाली आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात शेख याच्याकडे औषध खरेदीची पावती किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची सूचना असणारे कोणतीही लेखी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शेख आणि मिनाबाई या दोघांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा औषधांचा साठा पर राज्यातून आल्याचा पोलिसांना संशय असून औषध तस्करीच्या रॅकेट चालवणाऱ्या आरोपीच्या शोध घेतला जातो आहे.

हेही वाचा :

Back to top button