नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल... | पुढारी

नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल...

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कोचरगाव येथील पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अनेक वर्षांपासून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातून सहावर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी वारंवार केली. परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेण्या प्रवासाची शासन कधी दखल घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मा. सरपंच सुरेश लिलके, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लिलके, बाळू लिलके, वामन गागोडे, रघुनाथ आहेर आदींनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पुरामुळे गावात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे येथे पूल होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. परंतु संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे.
– रघुनाथ आहेर,
माजी सरपंच, कोचरगाव

हेही वाचा :

Back to top button