जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात | पुढारी

जळगाव : महावितरणच्या कर्मचार्‍यांवर वसुलीचा दबाव ; आमरण उपोषणास सुरुवात

जळगाव : तांत्रिक वीज कामगारांना आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी आवश्यक साहित्य पुरविले जात नाही. तर वीज बिल थकबाकीसाठी देखील तगादा लावला जातो, दिलेले टारगेट पुर्ण न झाल्यास वेळप्रसंगी कारवाईलाही सामोरे जावे लागते. या विरोधात महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

जळगाव विभागामध्ये ग्राहकांना अखंडीतपणे वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी तांत्रिक कामगारांना लागणारे मटेरियल, टूल किट, मिटर, फेज तर व मेंटेनन्ससाठी लागणारे सर्व साहित्य प्रशासनामार्फत पुरवले जात नाही. त्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होतो. या परिस्थितीमुळे कामगारांना एकच काम करण्यासाठी वारंवार वेळ खर्ची करावा लागतो. त्यात बिघाड झाल्यास तांत्रिक कामगारांना ग्राहकांचा रोषाला समोरे जावे लागत आहे. पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये कंपनीची प्रतिमा मलिन होत असून कंपनीचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्येक कामासाठी कंपनीने एजन्स्या नेमल्या असून, त्यामार्फत कुठलेही काम केले जात नाही. ही सर्व कामे पर्यायाने तांत्रिक कामगारांना करावे लागत आहे. यामुळे ग्राहकांची थकबाकी वसुली करण्यासाठी तांत्रिक कामगारांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तसेच वसुली वसुली पूर्ण न झाल्यामुने तांत्रिक कामगारांना दांडात्मक कारवाईला समोरे जावं लागत आहे. तसा पत्र व्यवहार तांत्रिक कामगारांना देण्यात येत आहे.

एकंदरीत एकतर्फी कारवाईचा बडगा तांत्रिक कामगारांवर उगरला जात आहे. जो पर्यंत तांत्रिक कामगारांवरील पत्र व्यवहार मागे घेतला जात नाही व सुरक्षा साधने व मटेरियल साहित्य मेटेनन्सचे उपलब्ध करून दिले जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा जळगाव विभागातील संयुक्त कृती समितीचा माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button