सुनील केदार यांनी केला भाजप नाशिक कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध | पुढारी

सुनील केदार यांनी केला भाजप नाशिक कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

नाशिक; पुढारी वृत्तसेवा: नाशिक येथे मंगळवारी सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. या हल्ल्याचा तीव्र निषेध सुनील केदार यांनी केला आहे. मी शिवसेनेच्या असंस्कृत कृतीचा धिक्कार करत आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे शिवसेना रडीचा डाव खेळत आहे, असे सुनील केदार (भाजप सरचिटणीस नाशिक महानगर) यांनी म्हटले आहे.

राणेंच्‍या अटकेनंतर उपराष्ट्रपतींना लेखी कळवणार : नाशिक पोलिस आयुक्‍त

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून नाशिक शहर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली होती.

गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस उपायुक्त संजय बारकंडु यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पथकात गुन्हे शाखा युनिट एकच पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचा समावेश आहे, असेही नाशिक पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांनी सांगितले.

ना. राणे हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच Rules Of Procedure And Conduct Of Business चे Rule 222 A प्रमाणे चेअरमन आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस उपआयुक्त संजय बारकुंडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळवावी. तसेच याशिवाय भारत सरकारच्या इंन्टेलीजन्स ब्युरो, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबंधीत जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना देखील नारायण राणे यांच्या अटकेची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

नाशिकमध्‍ये शिवसैनिकांचा भाजप कार्यालयावर हल्‍ला

मंगळवारी सकाळी शिवसैनिकांनी  नाशिक येथील   भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयावर हल्‍ला केला. नारायण राणे यांनी केलेल्‍या विधानाचा निषेध करत कार्यालयात तोडफोड केली. या परिसरात तणाव निर्माण झाला असून परिसरात पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण

Back to top button