नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा | पुढारी

नाशिक : पाणवेलींमुळे सायखेड्याचा पूल बंद, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीवरील पुलावर पुराच्या पाण्याने वाहून आलेल्या पाणवेलींमुले हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणवेली हटविण्यासाठी जास्तीत जास्त पोकलेन यंत्रांचा वापर करून हा पूर रहदारीसाठी तातडीने खुला करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.

पुलात अडकलेल्या पाणवेली काढण्यासाठी हा पूल रहदारीसाठी शेतकरी, व्यापारी, नोकरदार, गोरगरीब, मजुरी करणार्‍या, शेतीमाल घेऊन जाणारे टेम्पो, दूध टँकरसारख्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आलेला आहे. प्रशासनाने पूर येण्याच्या अगोदरच पाणवेली काढणे गरजेचे होते, परंतु आता भरपावसात आणि पुरात पाणवेली हटविल्या जात आहेत. परंतु यासाठी सायखेडा-औरंगाबाद मार्गच बंद केल्याने नाशिककडे जाणार्‍या नोकरदार तसेच व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. केवळ एका जेसीबीच्या सहाय्याने पाणवेली काढल्या जात असल्याने हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

सायखेडा येथील गोदावरी नदीपात्रावर मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्या असून, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. दरवर्षी या पाणवेली वाहून येतात व गोदावरीवरील पुलाच्या खांबांना येऊन अडकतात. पाटबंधारे खाते त्यावेळीच काढत नसल्याने त्या पावसाळ्यापर्यंत तशाच राहतात व वाढतात. परिणामी पाणवेलीमुळे पुलाजवळील आजूबाजूला असलेल्या शेतात तसेच वीटभट्टयांत पाणी जाऊन नुकसान होत आहे.

हेही वाचा :

Back to top button