नाशिक : सहा दिवसांत 14 ठिकाणी कोसळल्या दरडी | पुढारी

नाशिक : सहा दिवसांत 14 ठिकाणी कोसळल्या दरडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाच ते सहा दिवसांपासून वरुणराजा नाशिक जिल्ह्यावर कृपा करत आहे. संततधार कायम राहिल्याने सहा दिवसांमध्ये विविध तालुक्यांत दरडी कोसळण्याच्या 14 घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत रस्त्यावरील मलबा जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने वाहनधारकांसह स्थानिकांची गैरसोय टळली. भरपावसात रस्त्यावरील अडथळे हटवत ‘पीडब्ल्यूडी’च्या कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.

हरसूल-वाघेरा रस्त्यावर झालेल्या भूस्खलनातील मलबा तीन ट्रॅक्टर व एका जेसीबीच्या सहाय्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेठ-आंबोली रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. भावली-पिंप्री इगतपुरी रस्त्यावर तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. हरसूल-आडगाव रस्त्यावरील दरड अवघ्या एका तासात हटविण्यात कर्मचार्‍यांना यश आले होते. ननाशी-वलखेड रस्त्यावरील चारोसा नदीच्या पुलाचा भराव वाहून गेल्याने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

कळवण-देवळा रस्त्यावर दरड कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली होती. दरड हटविल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. सटाणा-चाळीसगाव, सुरगाणा-दांडीची बारी, सप्तशृंगीगड, बार्‍हे-कारसूळ, पेठ-हरसूल-वाघेरा, बोरगाव-कळवण, मळगाव-गावधरपाडा आदी रस्त्यांवर दरडी कोसळल्या. साल्हेर-कोठुरे रस्त्यावरील मोरी पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळासाठी बंद करून पाण्याचा जोर ओसल्यानंतर सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, सटाणा-चाळीसगाव रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक मंद गतीने सुरू होती. दरेगाव-भिलवाड रस्ता तसेच नांदुरी-अलियाबाद रस्ता मुसळधार पावसामुळे खचला होता. संबंधित दोन्ही रस्ते दुरुस्त केल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.

पावसाळ्यात दरड कोसळण्यासह रस्ता खचणे, पुलावरून पाणी वाहणे, वृक्ष उन्मळून पडणे यांसारख्या घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्वतयारी कर

Back to top button