नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका | पुढारी

नाशिक : डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांचा छापा ; 113 गोवंशांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडाळा गावातील जेमएमसीटी महाविद्यालयाजवळील जलाल डेअरी फार्मवर मुंबई नाका पोलिसांनी छापा टाकून 113 गोवंशांची सुटका केली. रविवारी (दि. 10) मध्यरात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी 69 गायींसह उर्वरित गोर्‍हे व बैलांची सुटका केली. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांना जलाल डेअरी फार्ममध्ये गायी व गोर्‍हे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी जलाल डेअरीवर टाकलेल्या छाप्यात 113 गोवंशीय जनावरे तेथे क्रूरतेने बांधलेली आढळली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून गायी, बैल, गोर्‍हे ताब्यात घेतले. यानंतर काही गाया व गोर्‍ह्यांना उपचारासाठी व शूश्रुतेसाठी पेठ रोडवरील नंदिनी गोशाळा, विल्होळीतील शरण संस्था व तपोवनातील कृषी गोसेवा या ट्रस्टकडे सोपविल्या आहेत. या संदर्भात जलाल डेअरी फार्मच्या चार संशयितांविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button