नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू ; तब्बल चार तासांनी सापडला मृतदेह

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 जुलै सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला व तीला जबड्यात फरफडत नेले.

तब्बल चार तासांच्या शोधमोहिमेनंतर या बालिकेचा मृतदेह गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात सापडला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button