दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले | पुढारी

दैव बलवत्तर ! ब्रेक फेल झालेली बस घाटाच्या काठावर आदळून थांबली ; 28 प्रवासी दरीत पडता पडता वाचले

नंदुरबार,पुढारी वृत्तसेवा

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगावहून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला. यात २० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मागील दोन दिवसात चरणमाळ घाटातली ही दुसरी घटना आहे. नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे घाटातील उतारावर वाहनांचे ब्रेक लागेनासे झाल्याने अपघात वाढल्याचे म्हटले जात आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, गुजरात परिवहन विभागाची एसटी बस ( क्र.G.J.18, Z.5650) मालेगाव हुन सुरतला जात असताना सकाळी ९.३० वाजे दरम्यान महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बस वरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

या बस मध्ये २८ प्रवासी होते. यात ७ प्रवाशांना जबर मार लागल्याने त्यांना १०८ रुग्णवाहीकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात बसचे चालक लक्ष्मनसिंग बलवंत रणावत व वाहक विलास भाऊजीभाई वसावा रा. छापटी, उच्छल, सुरत डेपो (वय ४८) यांना पायाला किरकोळ लागले आहे. घटनचे माहीती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळताच उपनिरीक्षक मनोज पाटील, पो हे का गणेश बच्छे, विनोद पराडे, प्रतापसिंग वसावे, प्रमोद वंजारी, नामदेव राठोड व पोलिस पाटील बोरझर यांनी जखमींना बाहेर काढुन १०८ रुग्णवाहीकेत टाकले.

हेही वाचा :

Back to top button