नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : सुर्वे | पुढारी

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : सुर्वे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन मध्य नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र सुर्वे यांनी मार्गदर्शनातून केले. ते आगामी निवडणुका व पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आले असता, त्यांनी शिवसेना व महिला आघाडी पदाधिकार्‍यांची शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयात बैठक घेतली.

याप्रसंगी व्यासपीठावर मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, संघटक रवींद्र जाधव, महिला आघाडी विधानसभा संघटक फैमिदा रंगरेज, श्रद्धा कोतवाल आदी उपस्थित होते. सुर्वे म्हणाले, आपल्यासाठी कसोटीचा काळ असला, तरी सर्वांना एकजुटीने शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचे हात बळकट करीत ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. असेही ते म्हणाले. नाशकातील शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे असून, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता निश्चित येईल, असा विश्वास कोकणे यांनी व्यक्त केला. बैठकीस वैभव खैरे, दत्ता दंडगव्हाळ, वीरेंद्रसिंग टिळे, उमेश चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button