जळगाव : एमबीबीएस विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या  | पुढारी

जळगाव : एमबीबीएस विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या 

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा : जळगाव- भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वैष्णवी किशोर लोखंडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

वैष्णवी लोखंडे ही समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे राहते. वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. वैष्णवी जळगाव- भुसावळ महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेत होती.

दरम्यान, तिला परीक्षांमध्ये कमी मार्क पडले होते, त्यामुळे ती काहीशी नाराज झाली होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी चर्चा मित्र-मैत्रिणींमध्ये आहे.

तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हद्य पिळवटून टाकणारा होता. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत. मृत वैष्णवीच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे.

Back to top button