...म्हणून मी गुवाहाटीला आलोय : सुहास कांदे यांचे स्पष्टीकरण | पुढारी

...म्हणून मी गुवाहाटीला आलोय : सुहास कांदे यांचे स्पष्टीकरण

नाशिक : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण नांदगाव मतदार संघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. त्यांनी फेसबुकवरुन हा संदेश दिला आहे.

एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा अन्य पक्ष वा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आम्ही स्वच्छने गुवाहाटीला आलो आहोत. माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध योजना व कामे मार्गी लावायची असतील तर मला शिंदे साहेबांबरोबरच थांबावे लागेल. तसेच हिंदुत्वासाठी आम्ही  शिंदेसाहेबांच्या बरोबर आहोत आणि मरेपर्यंत हिंदुत्वासाठी व मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत राहु असेही कांदे म्हणाले.

Back to top button