ई-बाइक आरटीओंच्या रडारवर ; नाशिक परिवहन विभागाची तपासणी मोहीम | पुढारी

ई-बाइक आरटीओंच्या रडारवर ; नाशिक परिवहन विभागाची तपासणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरत असलेली ई-बाइक सध्या सुसाट आहेत. ई-बाइक खरेदीकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढू लागल्याने, कंपन्यांकडून दररोज नवनवीन मॉडेल्स बाजारात आणले जात आहे. मात्र, गरज नसताना काही उत्पादक वाहनांमध्ये अनधिकृतपणे बदल करीत असल्याने, सध्या नाशिक परिवहन विभागाने थेट तपासणी मोहीमच हाती घेतली आहे.

राज्य सरकारने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या द़ृष्टिकोनातून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले. या वाहनांना करातून 100 टक्के सूट दिली. त्यामुळेच ई-बाइक्स घेण्याकडे नागरिकांनी धडाका लावला आहे. अनेकदा वाहन उत्पादक प्रमाणपत्र घेत नसल्याने ई-बाइकमध्ये परस्पर छेडछाड करून विक्री केली जात आहे. देशात ई-वाहनांची संख्या वाढून पेट्रोल व डिझेलवरील वाहनांची संख्या कमी व्हावी, असा शासनाचा उद्देश आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी याचा गैरफायदा घेत मूळच्या ई-वाहनात काही अनावश्यक बदल केल्याने देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता यासंदर्भात नाशिक आरटीओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ई-वाहनात बदल केलेला आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दरम्यान, अनधिकृतपणे अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून वाहनांची विक्री केली जात असल्याचे समोर येताच परिवहन आयुक्तांनी यापूर्वीच राज्यातील सर्व परिवहन अधिकार्‍यांची ऑनलाइन बैठक घेतली होती. यावेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. 250 वॉटपेक्षा कमी क्षमतेच्या ई-बाइक्स वाहन विक्रेत्यांकडे जाऊन अशा वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button