नाशिक : एकतर्फी प्रेमातून उंच डोंगरावरुन दरीत उडी घेत युवकाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : एकतर्फी प्रेमातून उंच डोंगरावरुन दरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

नाशिक (सुरगाणा) : प्रेमातून निराश झालेल्या गुजरात येथील युवकाने सापुतारा येथील टेबल पॉइंट (उंच डोंगरावरून) दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सोनीस देवचंदभाई गामित (19, रा. आसनगाव, ता. सोनगढ, जि. तापी) असे मृताचे नाव आहे.

सिलास शिंगाभाई गामित यांनी सुरगाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार सोनीस हा 15 जून रोजी दुचाकी (जी.जे. 26 एल 6798) घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र, घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सोनगढ पोलिसांत माहिती दिली. दरम्यान, त्याची दुचाकी सापुतारा येथील टेबल पॉइंटवर दिसून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरीचा भाग सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. सोनीसचा मृतदेह बुधवारी (दि.22) मिळून आला. एकतर्फी प्रेमातून ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button