नाशिक : गंजमाळ येथील मास्टर मॉलला आग | पुढारी

नाशिक : गंजमाळ येथील मास्टर मॉलला आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील गंजमाळ परिसरातल्या मास्टर मॉलला रविवारी (दि. 19) सायंकाळच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने आग उशिरापर्यंत धुमसत होती. परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा केला मात्र आगीवर पाणी जात नसल्याने आग पसरत होती.

गंजमाळ येथील मास्टर मॉलच्या इमारतीला सायंकाळच्या सुमारास आग लागल्याचे समजले. इमारतीला प्रशस्त खिडक्या किंवा इतर पर्याय नसल्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे इमारतीतील आग सर्वत्र पसरली होती. त्यातच मॉलच्या इमारतीपर्यंत पोहोचण्यात अग्निशमन दलाच्या वाहनांना अडचण येत असल्याचे दिसले. तरीदेखील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या छोट्या खिडक्यांमधून पाण्याचा मारा करीत आग विझविण्याचा प्रयत्न विभागाने केला. आग लागल्याचे समजताच तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.
भद्रकाली पोलिसांनी गर्दी बाजूला केली. रात्री आठपर्यंत आग विझलेली नव्हती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले.

हेही वाचा :

Back to top button