नाशिक : चोरट्यांनी मारला २२ तोळे सोन्यावर डल्ला | पुढारी

नाशिक : चोरट्यांनी मारला २२ तोळे सोन्यावर डल्ला

निफाड; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चोरट्यांनी २२ तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. २२ तोळे सोन्यावर डल्ला मारल्‍याचा प्रकार नाशिक ते चांदोरी प्रवासादरम्यान घडला. एका शेतकऱ्याचे सुमारे ४ लाख ४६ हजार रुपयांचे तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्‍याची तक्रार सायखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदोरी येथील शेतकरी सुदाम शंकर राऊत (वय ७२) प्रवास करत होते. दिनांक १२ रोजी दुपारी सव्वा दोन ते सव्वा तीनच्या दरम्यान नाशिक रोड सैलानी बाबा स्टॉप ते चांदोरी असा ते प्रवास करत होते.

राऊत यांच्‍या बॅगेमध्ये ठेवलेल्या छोट्या पिशवीतील एक तोळे सोन्याच्या चार बांगड्या, दोन तोळे सोन्याच्या दोन पाटल्या, तीन तोळे सोन्याचा चपलाहार, तीन तोळे सोन्याची मोहन माळ, अडीच तोळ्याचे सोने लॉकेट, एक तोळ्याचे दुसरे सोन्याचे लॉकेट, अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, सोन्याच्या मण्यांची माळ, चार सोन्याच्या नथी व दोन डोरले, पाच सोन्याच्या पाच मणचली असा एकूण २२ तोळे सोने गायब झाले.

३ ग्रॅम वजनाचे ४ लाख ४६ हजार रुपये किमतीचे सोन्‍याच्‍या दागिन्‍यावर  चोरट्यांनी डल्‍ला मारला. सुदाम राऊत यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सायखेडा पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अडसूळ, पोलीस उपनिरीक्षक तांबे व सायखेडा पोलीस करीत आहेत.

हेदेखील वाचलंत का –  

Back to top button