नाशिक : गोदावरीत बुडून एकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : गोदावरीत बुडून एकाचा मृत्यू

नाशिक : गाडगे महाराज पुलाजवळील गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यास आलेल्या गुलजार हमीद शाहा (३५) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत सलीम रजमाज पठाण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुलजार शाहा गाडगे महाराज पुलाजवळील गोदावरीच्या नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र काही वेळात ते पाण्यावर तरंगत किनाऱ्यालगत आले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र त्यांच्यात कुठलीच हालचाल दिसून आली नाही. त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेल्याने, त्यांचा मृत्यू झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button