नाशिक : रामकुंडावर समर्थ सेवेकर्‍यांचे गंगापूजन | पुढारी

नाशिक : रामकुंडावर समर्थ सेवेकर्‍यांचे गंगापूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते. पवित्रता, शुद्धता, निर्मळता, प्रक्षालन, परिष्कार, संयम, परोपकार, पापमुक्ती या सर्वांचं प्रतीक आपण गंगा-गोदा मातेस मानतो. आज जीवसृष्टीला नवचैतन्य देणार्‍या गंगा-गोदावरी मातेचे यथासांग पूजन करून तिचा सन्मान करत असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब मोरे यांनी केले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व पुरोहित संघाच्या वतीने गंगापूजनाचा सोहळा मोठ्या मंगलमय व भावपूर्ण वातावरणात अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, मनपा आयुक्त रमेश पवार, वत्सलाताई खैरे, महेश हिरे आदी उपास्थित होते. गंगापूर रोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिला-पुरुष सेवेकरी स्वामीनामाचा जप करत रामकुंड परिसरात पोहोचले.

हेही वाचा :

Back to top button