नाशिक : जेलरोड विकास प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे टँकर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणार्‍या जेलरोड विकास प्रतिष्ठानतर्फे जेलरोड परिसरात दोन महिन्यांत 265 पिण्याचे पाण्याचे टँकर नागरिकांना पुरविण्यात आले. या उपक्रमाचे जनतेतून कौतुक केले जात असून, आजवर लाखो रुपयांचा खर्च उपक्रमासाठी झाला आहे.

प्रतिष्ठानतर्फे नागरिकांसाठी मोफत वैकुंठरथाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गरजू नागरिकांना आजही याचा लाभ मिळतो आहे. केव्हाही गरज पडेल तेव्हा रथ नागरिकांकरिता उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे असंघटित कामगारांसाठी शासनाचे कार्ड, कोरोनात नागरिकांना किराणा उपलब्ध करून देण्यात आला होता. जेलरोड परिसरातील काही भागांत कायम कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतो. नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी जेलरोड विकास प्रतिष्ठानतर्फे मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही मागेल त्याला मोफत पिण्याच्या पाण्याची टँकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजवर 265 पेक्षा अधिक टँकर केवळ दोन महिन्यांत उपलब्ध करून दिले. त्यासाठी शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान घेतलेले नाही. – योगेश निसाळ, अध्यक्ष, जेलरोड विकास प्रतिष्ठान.

हेही वाचा:

Exit mobile version