नाशिक : खोकड तलावात युवकाचा बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : खोकड तलावात युवकाचा बुडून मृत्यू

नाशिक (चांदवड) : आग्रा महामार्गालगत असलेल्या खोकड तलावात सोमवार (दि.30) रोजी दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला देवी हट्टी येथील करण मोहन जाधव (16) हा पाण्यात बुडून मयत झाला. तलावात पाणी असल्याने करणचा शोध घेण्यात वेळ गेला. त्यांच्या घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या आईने करणच्या नावाचा एकच हंबरडा फोडला. पाण्यातून बाहेर काढल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. चांदवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button