चांदोरे खून प्रकरणी एकास जन्मठेप; दोन निर्दोष | पुढारी

चांदोरे खून प्रकरणी एकास जन्मठेप; दोन निर्दोष

निफाड (नाशिक); पुढारी ऑनलाईन : चांदोरे खून प्रकरणी एकास जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली. चांदोरे खून प्रकरणी निफाड येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ राजू साळवे यास शिक्षा सुनावली आहे.

न्‍यायालयाने एका आराेपीस भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७ नुसार दोषी ठरवून जन्मठेप व दंडांची शिक्षा सुनावली. तर इतर दोघांना निर्दोष मुक्त केले आहे .

निफाड तालुक्यातील रसलपूर शिवारामध्ये २०१४ साली झालेल्या सुनील चांदोरे यांच्या खून झाला हाेता. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ राजू साळवे याने मयत सुनील चांदोरे यांच्या घराचे दुरुस्तीचे काम घेतले होते.

अधिक वाचा – 

दिनांक २४ एप्रिल, २०१४ रोजी रात्रीच्या कामाच्‍या बहाण्याने सुनील चांदोरे यांना मोटरसायकलने कोठुरे फाटाकडे नेले. रस्त्यावर मोटारसायकल उभी करून चांदोरे याचा गळा कापला.

चाकूने वार करून जबर दुखापत

आरोपी सिद्धार्थ राजू साळवे याने चांदोरे यांच्या आईवरही चाकूने जीवघेणा हल्ला केला हाेता.

या घटनेची फिर्याद मयत सुनील चांदोरे यांची पत्नी भारती सुनील चांदोरे यांनी निफाड पोलिस ठाण्यात दिली होती.

२५ एप्रिल, २०१४ मध्ये निफाड पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला होता.

अधिक वाचा – 

या खटल्याचे कामकाज निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते. सरकारी वकील आर. एस. कापसे, तपासी अंमलदार निफाड उपविभाग आरोळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश थेटे हे या खटल्यात तपासी सरकारी अभियोक्ता व तपासी अंमलदार होते. या खटल्याचा निकाल निफाडच्या जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने दिला.

यात आरोपीस ३०२ व ३०७ कलमाखाली दोषी ठरवले. प्रत्येकी जन्मठेप व २६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक वर्षासाठी साधी कैद अशा दोन्ही शिक्षा एकत्र मिळून जन्मठेप व ५२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

५२ हजार रुपये दंडाच्या रकमेपैकी फिर्यादी आणि जखमी साक्षीदार यांना प्रत्येकी २५ हजार रुपये व दोन हजार रुपये सरकार जमा असा निकाल दिला होता.

यातील इतर दोन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने एकूण चोवीस साक्षीदार तपासण्यात आले.

हेदेखील वाचा- 

पाहा व्हिडिओ – 

Back to top button