नाशिक : नियमित बदल्यांना जि. प. प्रशासनाकडून खो? | पुढारी

नाशिक : नियमित बदल्यांना जि. प. प्रशासनाकडून खो?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया प्रशासनाने थांबविल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे बदलीपात्र असूनही सलग तिसर्‍या वर्षी अवघड क्षेत्रातील कर्मचार्‍यांना बदलीसाठी आणखी एक वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. बहुतांश विभागप्रमुखांनी नियमित बदली प्रक्रिया राबविल्यास सामान्य क्षेत्रात रिक्त जागांचा बोजा वाढणार असल्याचा अभिप्राय दिल्याचेही सांगितले जात आहे.

कोरोना महामारीचे संकट असल्याने 2020 व 2021 या दोन वर्षांमध्ये कर्मचारी नियमित बदली प्रक्रिया झाली नव्हती. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने बदली प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अवघड क्षेत्रात काम करणार्‍या प्रक्रिया होणार, हे निश्चित मानले जात होते. त्यादृष्टीने प्रशासनाने कर्मचार्‍यांची सेवाजेष्ठता यादी तयार केली होती. प्रशासनाने नियमाप्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू करीत दि. 23, 24 व 25 मे दरम्यान मुख्यालयातील तसेच दि. 26 ते 31 दरम्यान पंचायत समितीस्तरावरील बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मान्यतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केले जाईल. याच दरम्यान, शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवित 15 मे 2014 च्या आदेशाप्रमाणे कर्मचारी बदल्यांची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. मात्र, बहुतांश विभागप्रमुखांनी नियमित बदली प्रक्रिया राबविल्यास बिगरआदिवासी विभागातील रिक्त जागांचे प्रमाण वाढेल, असा अभिप्राय आहे.

रिक्त जागांच्या संख्येत आणखी भर पडणार
शासनाचे आदेश प्राप्त झाल्याने कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया होणार, असे निश्चित मानले जात होते. मात्र, बदली प्रक्रिया राबविल्यास सामान्य क्षेत्रातील रिक्त जागांच्या संख्येत आणखी भर पडणार असल्याने सर्व विभागप्रमुखांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते.

हेही वाचा :

Back to top button