नाशिक : तडीपार असूनही विनापरवानगी शहरात फिरणारा गुंड ताब्यात | पुढारी

नाशिक : तडीपार असूनही विनापरवानगी शहरात फिरणारा गुंड ताब्यात

नाशिक : शहर व जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार केलेले असूनही विनापरवानगी शहरात फिरणार्‍या गुंडाला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष मानसिंग ढमाळ (48, रा. अहिल्याबाई होळकर चौक, सातपूर) असे या गुंडाचे नाव आहे. तो त्र्यंबक रोड परिसरातील राजा नर्सरीजवळ मंगळवारी (दि. 24) सायंकाळी फिरताना आढळला. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला दि. 4 मे रोजी तडीपार केले होते, तरीदेखील त्याने विनापरवानगी शहरात वास्तव्य केले होते.

हेही वाचा :

Back to top button