धुळे : पांझराकान साखर कारखाना सुरू करण्यासाठी साकडे  | पुढारी

धुळे : पांझराकान साखर कारखाना सुरू करण्यासाठी साकडे 

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
भाडणे येथील मोठ्या कालावधीपासून बंद असलेला पांझराकान सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासंदर्भात घडामोडी सुरू आहेत. त्या अनुषंगाने साक्री येथील बालआनंदनगरी येथील सर्वपक्षीय कामगार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये कारखाना सुरू करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे व साखर कारखान्याचा दांडगा अनुभव असणा-या आमदार रोहित पवार यांची भेट घेत कारखाना सुरू करण्यासाठी साकडे घालण्यात आले. हा साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा :

Back to top button