नाशिक : घरात शिरुन मंगळसूत्र नेले चोरून | पुढारी

नाशिक : घरात शिरुन मंगळसूत्र नेले चोरून

नाशिक : वडाळा नाका येथील रेणुकानगर परिसरात एकाने घरातून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरला अशोक कळकटे (50, रा. वडाळा नाका) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित स्वप्नील देवकर (30, रा. चाळीसगाव) यांच्याविरोधात चोरीची फिर्याद दाखल केलीे. सरला यांच्या फिर्यादीनुसार संशयित स्वप्नील याने 4 मे रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दोन तोळे वजनाचे 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा संशय आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button