नाशिकमध्ये उष्णतेत अंशतः घट; पारा 'इतक्या' अंशांवर | पुढारी

नाशिकमध्ये उष्णतेत अंशतः घट; पारा 'इतक्या' अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींनी धुमाकूळ घातला असताना, नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. रविवारी (दि. 22) नाशिकमध्ये 33.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.

यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल झाला असून, अरबी समुद्राकडे त्याची आगेकूच सुरू आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणासह राज्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र, एकीकडे मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली असतानाच, नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवेतील उष्ण लहरींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. उन्हाचा जोर बघता, नाशिककरांनी रविवारी सुटी असूनदेखील सायंकाळनंतर घराबाहेर पडणे पसंत केले.

ग्रामीण भागालाही उन्हाचा चटका जाणवत आहे. परंतु, मान्सूनने वेळेआधीच देशात वर्दी दिल्याने बळीराजा शेतीच्या कामांमध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर जिल्ह्याच्या पार्‍यातील चढ-उतार कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button