नाशिक : हळदीच्या कार्यक्रमात नाचताना कुरापत काढून एकावर कोयत्याने हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्काबुक्की करण्याची कुरापत काढून चौघांनी मिळून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना बजरंगवाडी परिसरात घडली. संकेत नंदकिशोर तोरडमल (२१, रा. बजरंगवाडी) हा युवक जखमी झाला आहे.
संकेतच्या फिर्यादीनुसार तो मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमात गुरुवारी (दि.१९) रात्री सव्वा दहाच्या सुमारास बजरंगवाडी येथील सातमाऊली मंदिराजवळ नाचताना संशयित अक्षय देविदास जाधव, ज्ञानेश्वर गंगाधर दिवे, प्रविण मोहन पीठे व रुपेश मधुकर पीठे (चौघे रा. बजरंगवाडी) यांनी कुरापत काढून मारहाण करीत अक्षयने कोयत्याने वार करीत गंभीर दुखापत केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री सडक योजनेला ‘नियोजन’चा हात; 646 किलो मीटर रस्त्यांसाठी 129 कोटी रुपये वर्ग होणार
- Shehnaaz Kaur Gill : जॉर्जियाच्या पार्टीत पांढऱ्या कलरच्या कॉर्सेट टॉपमध्ये शहनाजचा जलवा (video)
- अभय योजनेकडे थकबाकीदारांची पाठ; योजनेला 1 टक्काही प्रतिसाद नाही