नाशिक : देवळालीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक : देवळालीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
येथील बोहरी मस्जिदसमोरील जुने भाजी मार्केटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, रंगाने गोरा, चेहरा उभट, शरीराने सडपातळ, उंची 5 फूट, डोक्याचे व दाढीचे केस काळे, तुरळक सफेद व वाढलेले, निळ्या रंगाची जीन्स, उजव्या हाताचे दंडावर बदामाच्या आकाराच्या नक्षीमध्ये इंग्रजी व्ही अक्षर गोंदलेले असून, या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास देवळाली कॅम्प पोलिसांना संपर्क साधावा.

हेही वाचा :

Back to top button