नाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा | पुढारी

नाशिक : साडेआठ लाखाच्या फसवणूक प्रकरणी तीन महिलांना शिक्षा

नाशिक पुढारी वृत्तसेवा : बचत गट स्थापन करून साडेआठ लाख रूपयांचा अर्थिक अपहार करून फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदारांना शिक्षा झाली आहे. फसवणुकीची रक्कम ८,४७ ५०० एवढी आहे. हा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीत नोव्हेंबर २००७ ते दि २५ सप्टेंबर २००८ या कालावधीत घडला होता.

या गुन्ह्यातील आरोपी सुरेखा रमेश वाघ (रा. दादासाहेब गायकवाड नगर राजवाडा सातपूर) , संगिता रामचंद्र पवार (रा. राजवाडा सातपूर), कविता पवार (रा. आरटीओ कॉर्नर जयंती हॉस्पीटल समोर) यांनी फिर्यादी, साक्षीदार (महीला) यांना महीलांचे बचतगट स्थापन करण्यास सांगीतले व १.५ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून कर्ज मंजूर करण्यासाठी १००० ,२०००, ५००० अशी वर्गणी जमा करण्यास सांगून फसवणूक केली.

जमा केलेली एकूण वर्गणी रक्कम ८,४७ ५०० रू. आरोपींनी स्वतःच्या फायदयासाठी वापरून यातील फिर्यादी व साक्षीदार यापैकी कोणासही कर्ज मंजुर न करता त्यांची फसवणुक केली.  यानंतर नाशिकरोड पोलीस ठाणेत भा.द.वि कलम ४२० , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ई .के.पाडळी तत्कालीन नेमणूक नाशिकरोड पोलीस ठाणे नाशिक शहर, यांनी केला. आरोपींविरुध्द् मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मोटार व्हेइकल कोर्ट नाशिकरोड येथे सुरू होती.

१३ मे रोजी २०२२ रोजी डी. डी. कर्वे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मोटार व्हेइकल कोर्ट नाशिकरोड यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना सीआरपीसी कलम २३५ ( २ ) अन्वये खालील प्रमाणे शिक्षा सुनावलेली आहे. भादंवि कलम ४२० , ३४ मध्ये ०३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १,५०,००० / – रुपये दंड , दंड न भरल्यास ०६ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता म्हणून श्रीमती सायली अजित गोखले यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचलतं का?

Back to top button