नाशिक : कंपनीतील साहित्य चोरी करणारे पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

नाशिक : कंपनीतील साहित्य चोरी करणारे पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमधील तांबे व पितळाच्या सुट्या भागांची चोरी करणार्‍या सहा संशयितांना अंबड पोलिसांनी तीन लाखांचा मुद्देमालासह गजाआड केले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत 2 मे रोजी रात्री कृष्णा उद्यान कंपनीच्या कंपाउडच्या भिंतीवरील लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी तांब्याचे सिल्चर प्लेटिंगचे सुटे भाग चोरी केले होते. या प्रकरणी कंपनीचे संचालक राजेंद्र पवार यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, नंदन बगाडे, श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत घरकुल योजना येथे राहणारा संशयित बिट्टू सूर्यभान जयस्वाल (21, मूळचा उत्तर प्रदेश) यांची चौकशी केली असता त्याने तीन साथीदारांसोबत चोरी केल्याची माहिती दिली.

त्यानंतर या संशयितांनी हा माल भंगार विक्रेता जमीरउल्ला अब्दुला खान ऊर्फ पिंटू यास विकल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची चौकशीत त्याने माल 630 रुपये किलोने अंबड लिंक रोडवरील शिवसिंग देवीसिंग राठोड यास विकल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसिंग यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा माल 730 रुपये किलोने सिन्नर येथील एस. एस. आर.पी या कंपनीत राजेंद्र नवनाथ चितळे यास विकल्याचे सांगितले. म्हणून राजेंद्र चितळे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हा माल भट्टीमध्ये वितळविल्याचे सांगितले. दरम्यान, हा माल जप्त करून त्यांनी वस्तूचे स्वरूपात बदल केल्याने या सर्वांना अटक करण्यात आली आहे. हा माल दोन लाख 65 हजार रुपये किमतीचा असून, यात एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button