नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल | पुढारी

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात वाडीवर्‍हे पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. डॉ. वाजे यांच्या खून प्रकरणी त्यांचे पती संदीप वाजे व आणखी एकास अटक केली आहे. लवकरच सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाच्या सिडको येथील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा जानेवारी महिन्यात वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून सुरुवातीस त्यांचा पती संदीप वाजे यास अटक केली. त्यानंतर सखोल तपासात संदीपचा मावसभाऊ यशवंत म्हस्के यास अटक केली. म्हस्के याच्या मदतीने थंड डोक्याने कट रचत खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. वाजे व म्हस्के या दोघांनी मिळून अत्यंत नियोजनबद्ध व सराईत गुन्हेगारांप्रमाणे सुवर्णा वाजे यांना पार्टीसाठी शहराबाहेर बोलावून घेत वाडीवर्‍हे शिवारातील रायगडनगर येथे महामार्गालगत त्यांची हत्या करून मोटारीसह पेटवून दिले होते. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाले असून, सुनावणीस सुरुवात होईल.

हेही वाचा :

Back to top button