शिवसेनेची अवस्था बेडकासारखी : गिरीश महाजन | पुढारी

शिवसेनेची अवस्था बेडकासारखी : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. फक्त डराव डराव करून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणून दाखवावे, असे आव्हान भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

आ. महाजन यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, देशात सर्वाधिक बहुमताने मोदींच्या नेतृत्वात भाजपची ऐतिहासिक सत्ता आली आहे. शिवसेनेची कुवत काय हे आधी ओळखावे. या पक्षाची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. यापेक्षा समुद्रात काय चाललंय ते त्यांनी पाहावे. देशाची जनता मोदींकडे नेतृत्व म्हणून पाहते. राज्यातील रस्ते विकास, मेट्रो, समृद्धी महामार्गात शिवसेना, महाविकास आघाडी सरकारचे काय कर्तृत्व आहे? हे विकास प्रकल्प मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत सेनेने चार खासदार तरी निवडून आणावे, असे आव्हान महाजन यांनी दिले.

हेही वाचा :

Back to top button