धुळे : मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत माई लेकराचा मृत्यू | पुढारी

धुळे : मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत माई लेकराचा मृत्यू

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यातील मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून माई लेकराचा मृत्यू झाला. नांदगाव मुळडोंगरी तांड्यावरील रहिवासी असलेल्या ३६ वर्षीय ऊसतोड महिला मजूर व तिच्या १० वर्षीय मुलासोबत ही दुर्दैवी घटना घडली.

ऊसतोड मजूर महिला व तिचा मुलाला घेऊन मोरशेवडी इथे तिच्या माहेरी गेली होते. येथे शेतातील विहिर पहाण्यासाठी गेले असता विहिरीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button