नाशिक : केअर टेकरने पावणेतीन लाख लांबविले, आजी मयत झाल्याचे सांगून पसार | पुढारी

नाशिक : केअर टेकरने पावणेतीन लाख लांबविले, आजी मयत झाल्याचे सांगून पसार

नाशिक : केअर टेकरने पावणेतीन लाखांची रोकड लांबविल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मावजी शाह (८४, रा. सजानंद एनक्लेव्ह, लॅमरोड, बेलत गव्हाण फाटा) यांच्या घरी संशयित जगदीश मदनलाल नगारसी राठी हा केअर टेकर म्हणून कामाला होता.

शाह हे झोपलेले असताना संशयिताने आजी मयत झाल्याचे सांगत मुळगावी निघून गेला. काही वेळाने शाह यांनी कपाट तपासले असता २ लाख ७० हजारांची रोकड गायब झाली होती. शाह यांच्या फिर्यादीवर राठीविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button