आता नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा श्रेयवाद रंगला ! | पुढारी

आता नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा श्रेयवाद रंगला !

नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा) : विकासकामांना गती मिळत नसल्याने जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नवीन 45 ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या. दरम्यान, महाविकास आघाडीतील मंत्री के. सी. पाडवी आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी या विभाजनाचे श्रेय घेणारे दावे प्रतिदावे केल्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद अधोरेखित झाले आहेत.

विकासकामांचा मार्ग मोकळा करणारे हे विभाजन केल्याचा महाविकास आघाडीतील मंत्री के, सी, पाडवी यांच्याकडून आज दावा करण्यात आला. तर, शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील आपल्या प्रयत्नांमुळे हे विभाजन झाल्याचा दावा कालच केला होता.

‘न्यायालयाकडून बसणाऱ्या फटक्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या दोन्ही गालावर सूज आली आहे

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या वतीने कळविण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नंदुरबार हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेला जिल्हा असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश नंदुरबार जिल्ह्यात आहे. मोठ्या क्षेत्रफळाच्या ग्रुप ग्रामपंचायतीमुळे विकास कामांना गती मिळत नसल्याने पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अश्या 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नविन 45 ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने जुन -2020 ते मार्च -2021 या कालावधीत ठराव करुन विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडे 14 सप्टेंबर 2021 रोजी पाठवला होता. तदनंतर राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुचनेनुसार विभागीय आयुक्त, नाशिक यांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी शासनास प्रस्ताव सादर केला. पुढे या प्रस्तावाचा आदिवासी विकास मंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी सर्व स्तरावर पाठपुरावा केला. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य यांनी केलेल्या मागणीचा पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी स्वतः लक्ष घालत आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच यश आल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री के.सी पाडवी यांनी दिली आहे.

आता निपाणीत ‘भोंगा’ सुरु; मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी

तथापि याआधी शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दावा करतांना म्हटले आहे की, अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांना शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन आवश्यक असल्याची माहीती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याच अनुषंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरावा केला, असेही रघुवंशी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

एकंदरीत या दावे-प्रतिदाव्यामुळे महा विकास आघाडीतील नेत्यांमध्ये विभाजनावरून जुंपल्याचे चित्र बनले आहे.

Rajya Sabha Polls : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान!

नंदुरबार जिल्हयातील विभाजन होणाऱ्या ग्रामपंचायती

  • धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायती 1) मांडवी बु. 2) भुषा 3) राजबर्डी 4) तोरणमाळ 5) रोषमाळ 6) गेंदा 7) चिंचकाठी 8) बिजरी 9) चिखली 10) कात्री
  • अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत 1) उमरागव्हाण
  • नवापुर तालुक्यातील ग्रामपंचायत 1) करंजवेल 2) पाटी बेडकी
  • नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत 1) राकसवाडे
  • शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत 1) कलमाडी त.बो.

हेही वाचा….

Back to top button