धुळ्यात आंदोलनास जाणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यात आंदोलनास जाणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य शासनाला मशिदीवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिलेला असल्यामुळे आज धुळे शहरात आंदोलनासाठी जात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य शासनाच्या आणि पोलिस प्रशासनाच्या कोणत्याही दडपणाला बळी पडणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत महाराष्ट्रातील मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा दिला होता. भोंगे न उतरविल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्याना दिले होते. राज ठाकरेंच्या आदेशानुसार धुळ्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देवपुरातून मोगलाई येथील मशिदीच्या समोर आंदोलनाचा प्रयत्न केला. शहरातील शिवतीर्थ या चौकात पोलीसांनी या कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी घोषणा देत हातात भोंगा घेत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच राज्य सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. मोगलाई तील मशिदीकडे जाण्यापूर्वीच शहर पोलिसांनी मनसेच्या पदाधिका-यांना ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे आणले.

कर्कश आवाजातील भोंग्यामुळे अबाल वृद्धासह सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच मनसे आंदोलन करत आहे. राज्य सरकारने तातडीने मशिदींवरील भोंगे काढावे, यासाठी मनसे तीव्र आंदोलन करीत आहे. पोलीस प्रशासनाने नोटीस दिली आहे. तर राज्य सरकार देखील दडपण आणत आहे. पण मनसे कोणत्याही दडपणाला घाबरणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. दुष्यत राजे देशमुख यांनी प्रसार माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मशिदीवरील भोंगे न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तूर्तास तरी धुळ्यातील सर्वच मशिदीवर पोलीस बंदोबस्त असून शांतता आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. दुष्यन्त राजे देशमुख, संदीप जडे, संतोष मिस्तरी, प्रश्नांत तनेजा, राजेश दुसाने, योगेश वाणी, हरीश जगताप, संध्या पाटील, स्वाती जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news