नाशिक : एमजीरोडला हवेत धुराचे लोट, नेमकं काय घडलं? | पुढारी

नाशिक : एमजीरोडला हवेत धुराचे लोट, नेमकं काय घडलं?

नाशिक : पुढारी ऑनलाइन ; एमजीरोडला जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत कुणी अज्ञाताने कचरा पेटवून दिल्याने हवेत धुराचे लोट पसरले. यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात धुराचे लोट कुठून येताय हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

या परिसरात बहुसंख्य मोबाईल विक्रेत्यांची दुकाने आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे ई-कचरा साठतो. येथील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत पडलेला हा ई-कचरा कुणी अज्ञाताने पेटवून दिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर विषारी काळ्या धुराचे लोट हवेत पसरले होते. या परिसरात आजूबाजूला दवाखाने, ईलेक्ट्रीकल दुकाने असल्याने नागरिकांमध्ये काहीशी घबराट पसरली. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर साचणा-या ई-कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

Back to top button