नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन चोरीचे रॅकेट उघड ; दोघांना बेड्या | पुढारी

नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन चोरीचे रॅकेट उघड ; दोघांना बेड्या

मनमाड (नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; इंधनाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वॅगन मधून पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना आरपीएफच्या पथकाने पकडले असून या घटनेमुळे मनमाड मध्ये खळबळ उडाली आहे. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

मनमाड पासून जवळ पानेवाडी येथे ऑईल कंपन्यांचे इंधन प्रकल्प असून त्यात मालगाडीच्या माध्यमातून इंधन आणले जाते. रॅक मधून इंधन खाली केल्यानंतर रिकाम्या डब्यात उरलेले पेट्रोल-डिझेल चोरले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. विठ्ठल सगळे आणि विजय सांगळे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 75 लिटर पेट्रोल आणि 50 लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. विठ्ठल हा रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button