नाशिक : विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या | पुढारी

नाशिक : विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा ; चांदवड तालुक्यातील धोंडगबिव्हाणवाडी गावात चार ते पाच महिने वय असलेला बिबट्या विहिरीत पडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.18) घडल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांनी दिली.

तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील योगेश बस्ते या शेतकर्‍यांच्या गट नंबर 10/ड मधील विहिरीत बिबट्या पडून मृत झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वडनेर भैरवचे वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, वनरक्षक विजय टेकनर, वाल्मीक व्हरगळ, वनमजूर वसंत देवरे, वाहनचालक अशोक शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी बिबट्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वर काढला. यावेळी वडनेर भैरव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. काटे यांनी शवविच्छेदन केले. या बिबट्यावर चांदवड येथील वनवसाहतीत दहन करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button