नाशिक : वाइन शॉपची भिंत फोडून लाखोंचा मुद्देमाल केला लंपास | पुढारी

नाशिक : वाइन शॉपची भिंत फोडून लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील देवी रोड भागातले सरस्वती वाइन्स शॉप फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 15) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवी रोड भागातील सरस्वती वाइन्स या दुकानाची मागील भिंत फोडून दुकानात प्रवेश करून 89 हजार रुपये रोकड, 2 हजार 600 रुपये दराच्या टीचर्स कंपनीच्या 4 बाटल्या, 700 रुपये दराच्या स्टर्लिंग कंपनीच्या 3 बाटल्या, 1,350 रुपये किमतीची ब्लेंडर कंपनीची 1 बाटली, 36 हजार रुपये किमतीचे ओसीब्लू कंपनीचे 9 बॉक्स, 42 हजार रुपये किमतीचे आर एस कंपनीचे 5 बॉक्स, 14 हजार 800 रुपये किमतीचे नंबर 1 कंपनीचे 2 बॉक्स असा एकूण 2 लाख 22 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

प्रकरणी महेश हरगुलदास दर्यानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आवारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button