Nashik : मोसम बंधाऱ्यात १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यु | पुढारी

Nashik : मोसम बंधाऱ्यात १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यु

मालेगाव, पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील अजंग गावाजवळील मोसम नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत पवार (१३) असे मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. चंद्रकांत हा एकुलता एक असल्याने पवार कुटुंबात शाेककळा पसरली. अजंग येथील संजय पवार हे पत्नी, मुलगा, मुलगी यांसह वास्तव्यास आहेत. (Nashik)

आई व वडील कामाला गेले असताना चंद्रकांत हा मित्रासाेबत माेसम नदीच्या पात्रात पाेहायला गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात खेचला गेल्याचे समजते. मुलाच्या मृत्युचे कळताच आई-वडीलांनी हंबरडा फाेडला. मालेगावच्या रूग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik)

हेही वाचलंत का?

Back to top button