कोकणच्या हापूस आंब्याची व्हाया लासलगाव अमेरिका वारी

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on
Updated on

लासलगाव : राकेश बोरा
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेत सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन पहिल्या कंटेनरमधून 3 टन आंबे 950 पेट्यांतून अमेरिकेला रवाना झाले.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे. दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याच्या निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणार्‍या हापूस आंब्यावर 2013 मध्ये बंदी घातल्याने त्यामुळे फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण आता ही चिंता मिटली असून, गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच सुरू झाली आहे.

12 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अ‍ॅग्रो सर्च या कंपनीच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया केली जात आहे. लासलगाव येथे 31 ऑक्टोबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणार्‍या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशहरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

कोणत्या देशात निर्यात ?

लासलगाव येथून आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे.

2020 आणि 2021 कोरोना प्रादुर्भावामुळे आंबा परदेशात न गेल्याने विकिरण प्रकिया झाली नाही. यंदाच्या हंगामातील पहिल्या साडेसात मेट्रिक टन आंब्यांवर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापार्‍यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. यावर्षी मात्र 700 ते 800 मेट्रिक टन आंब्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– संजय आहेर, विकिरण प्रक्रिया अधिकारी,
भाभा अणु संशोधन केंद्र, लासलगाव

विकिरण प्रक्रिया म्हणजेे काय?
लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा 400 ते 700 ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news