नाशिकला दीड महिन्यांसाठी मिळाले शिक्षणाधिकारी ; म्हणाले हा कालावधी माझ्यासाठी... | पुढारी

नाशिकला दीड महिन्यांसाठी मिळाले शिक्षणाधिकारी ; म्हणाले हा कालावधी माझ्यासाठी...

नाशिक (सिडको) : पुढारी वृतसेवा

शिक्षण विभागात काम करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी माझ्यासाठी कमी नाही. एकही कायदेशीर कामकाज पेन्डींग राहणार नाही, याची खात्री देतो असे आश्वासन नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी दिले.

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारल्या नंतर रामदास हराळ यांचे मुख्याध्यापक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी हराळ बोलत होते. यावेळी मावळते प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी देशमुख यांनी प्रास्ताविकेतून शिक्षणाधिकारी यांच्या औरंगाबाद, अहमदनगर जळगांव येथील प्रशासनाच्या उत्कृष्ट कामाचा परिचय दिला. नाशिकमध्ये शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासोबत कार्यालयात दप्तर  दिरंगाईचा नियम लागु करावा अशी विनंती केली.

सत्काराला उत्तर देतांना नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी आपल्याला 22 वर्षे गटशिक्षणाधिकारी व तीन वर्षे शिक्षणाधिकारी व थोडया कालावधीसाठी निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून  प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्यामुळे दीड महिना कालावधी कमी असला तरी कोणतेही कायदेशीर काम पेडींग राहणार नाही असे ते म्हणाले.

यावेळी कक्षअधिक्षक शिवाजी शिंदे , जि.प. कक्ष अधिक्षक सुधिर पगार, मुख्याध्यापक संघाचे सचिव  एस.बी देशमुख, भागीनाथ घोटेकर, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाठ, बी.के. नागरे, बी.डी गांगुर्डे, किशोर पालखेडकर, संजय देसले, प्रकाश पानपाटील, शरद गिते, राजेन्द्र महात्मे, एस.टी. म्हस्कर, रामराव बनकर , एम.व्ही.बच्छाव, राजेन्द्र लोंढे,  जितेंन्द्र राठोड , सी. जे . शेलार, भरत भामरे, पोरजे के. एन, किरण नाठे, चेतन पोकणे यांच्यासह  मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button