बनावट दारु भोवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी निलंबित - पुढारी

बनावट दारु भोवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चार कर्मचारी निलंबित

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे याच्या भरारी पथकाने भुसावळ येथील बनावट दारु बनवण्याचा कारखाना उद्ध्व‍स्त केला होता. बनावट दारु प्रकरणी जळगाव येथील निरिक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने उत्पादन शुल्क विभागाच्‍या कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवर एका फर्निचर दुकानाच्या गोदामात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना पुणे विभागाच्‍या पथकाने उद्ध्व‍स्त केला होता.

अधिक वाचा 

भुसावळात हा कारखाना सुरू असताना स्‍थानिक अधिकारी काय करत होते? हा प्रश्‍न ऐरणीवर आला. तसेच या कारवाईची राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे गंभीर दखल घेण्यात आली.

अधिक वाचा 

या प्रकरणी भुसावळ येथील निरीक्षक आय. एन. वाघ यांच्यासह के. बी. मुळे, एस. एस. निकम व एम. बी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे सचिव कांतीलाल उमप यांनी हे आदेश जारी केले आहेत.

अधिक वाचा 

राज्य उत्पादन शुल्क खात्यातील गैरव्यवहार हे आधीदेखील वादाच्या भोवर्‍यात सापडले असले तरी एकाच वेळी निरिक्षकासह चौघांना निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button