नाशिक : सिन्नर येथे बारदानाच्या दुकानाला भीषण आग | पुढारी

नाशिक : सिन्नर येथे बारदानाच्या दुकानाला भीषण आग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ; येथील गावठा भागातील मारुती मंदिर परिसरात एका बारदानाच्या दुकानाला गुरुवारी (दि. 31) दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशमन बंब यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. सिन्नर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले. या घटनेत बारदानाचे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेजारीच असलेल्या एका सलूनच्या दुकानाला ही या आगीची झळ बसली. स्थानिक नागरिकांनी भीषण आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हेही वाचा :

Back to top button