धुळे : पुण्याच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ४० लाख लुटले | पुढारी

धुळे : पुण्याच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ४० लाख लुटले

धुळे, पुढारी वृत्तसेवा : कॉपर केबल खरेदीच्या नावाखाली पुणे येथील व्यापाऱ्याला धुळ्यात बोलावून त्याची ४० लाखाची रोकड लुटल्याचा (Robbed) प्रकार घडला आहे. यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणे येथे राहणारे दसमिल सुखविंदर कालरा यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून त्यांना राजेंद्र पाटील, महेश पाटील व सागर पाटील नावाच्या व्यक्तीने फोन करून त्यांच्याकडे कॉपरची केबल असल्याची माहिती दिली. ही केबल खरेदी करण्यासाठी साक्री तालुक्यातील छडवेल शिवारातील सुजलोन कंपनीचे प्रकल्पाजवळ त्यांना बोलवण्यात आले. त्यानुसार कालरा हे याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना फोन करणाऱ्या तिघांसह अन्य ८ ते १० जणांनी हल्ला करून मारहाण (Robbed) सुरू केली.

यावेळी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या बागेतील ४० लाखाची रोकड या हल्लेखोरांनी हिसकावून घेतली. यानंतर त्यांनी पलायन केले. या संदर्भात फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच दस्वेल कालरा यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार १३ जणांविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? : 

Back to top button