नाशिक : छतावरील पत्रे उचकटवून भंगार विक्री दुकानात चोरट्यांचा डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कथडा परिसरात चोरट्याने भंगार दुकानाचे छतावरील पत्रे उचकटवून घरफोडी करीत ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इरफान रफीक चौधरी (२५, रा. खोडे नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने २५ ते २६ मार्च दरम्यान घफरोडी करून दुकानातील ३० किलो वजनाचे पितळाचे तुकडे, तीन बॅटरी असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- नाशिक : दुचाकी चोरांना बेड्या ; केटीएमसह तीन दुचाकी हस्तगत
- नाही तर ‘घंटा’ मिळणार नाही ! उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली
- नाशिक : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू