सिडकोत युवकाचा किरकोळ कारणातून खून, एकास अटक - पुढारी

सिडकोत युवकाचा किरकोळ कारणातून खून, एकास अटक

सिडको; पुढारी वृत्तसेवा: नाशिक येथील सिडकोत युवकाचा खून करण्‍यात आला. ही घटना बुधवारी (दि. २८) रोजी रात्री नाशिक येथील स्टेट बँकजवळील एका  हॉटेलच्या परिसरात घडली.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी  एकास अटक केली आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे .

अधिक वाचा 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनाली हॉटेलजवळ बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास तीन ते चार युवकांनी प्रसाद भालेराव (वय २५, रा. उपनगर परिसर, नाशिकरोड) याला किरकोळ कारणावरुन फरशीने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

अधिक वाचा 

यानंतर प्रसादला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदेसह घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी पाहणी केली.

अधिक वाचा 

या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तपास अंबड पोलिस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी सिडकोमध्ये पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने तीन जणांना कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती.

हेही वाचलंत का? 

पाहा : साडेचार वर्षाच्या आयुषने मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

Back to top button