Bahinabai Chaudhary : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्‍वरी | पुढारी

Bahinabai Chaudhary : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्‍वरी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :  थोरात कापुरे कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्‍वरी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. कुलगुरू पदासाठी पाच जणांनी मुलाखती दिल्या होत्या. यातून डॉ. माहेश्‍वरी यांची निवड झाली असून ते सातवे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारतील.

Money laundering : नागपुरात सव्वाचार कोटींची रोकड जप्त

डॉ. पी. पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर डॉ. विजय माहेश्‍वरी यांची वर्णी लागली आहे. ते विद्यापीठातील बायो-केमिस्ट्री या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठातून बी.एस्सी. आणि नंतर बायोकेमिस्ट्रीत एम.एस्सी आणि पीएच.डी. संपादन केली आहे.

पुणे : शेळगाव येथे ‘महावितरण’विरोधात बोंबाबोंब आंदोलन

प्रोटीन बायोकेमिस्ट्री, बायो टिश्यू कल्चर आदी त्यांच्या अध्ययनाचे विषय होते. १९९४ साली राष्ट्रीय पातळीवरील यंग सायंटीस्ट पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. पी. पी. पाटील यांच्या नंतर पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची(Bahinabai Chaudhary) धुरा ही विद्यापीठातीलच विभाग प्रमुखाकडे गेली आहे.

हेही वाचलंत का : 

Women’s World Cup 2022 : बुमराहची पत्नी संजना गणेशनने केले युक्रेनचे समर्थन?

डोंबिवली : औषध देण्यास नकार, दोघा नशेखोरांनी मेडिकल फोडले; घटना सीसीटीव्हीत कैद

Shahrukh : ‘पठाण’चा नवा लूक, ड्रायव्हरला मारली मिठी अन्… (video)

पहा व्हिडिओ 

काय आहे मुंबईच्या प्रसिद्ध धोबीघाटाचा इतिहास ? : पुढारी ऑनलाईन स्पेशल

Back to top button