नाशिक : रात्र एक घरफोड्या दोन ; चोरट्याने केला लाखोंचा ऐवज लंपास | पुढारी

नाशिक : रात्र एक घरफोड्या दोन ; चोरट्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शिवारातील शिवाजीनगर परिसरात चोरट्याने एकाच रात्री दोन घरे फोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश बाळासाहेब गवळी (३१, रा. शिवशक्ती चौक, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार २८ फेब्रुवारीला दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान चोरट्याने गणेश यांच्यासह परिसरातीलच रहिवासी अशोक रंगनाथ वाघ यांच्या घरात घरफोडी केली. चोरट्याने गणेश गवळी यांच्या घरातून १० हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यात दोन ग्रॅम वजनाचे साेन्याचे व २० भार चांदीचे दागिने व पाचशे रुपयांची रोकड असा ऐवज होता.

त्याचप्रमाणे वाघ यांच्या घरातही घरफोडी करून चोरट्याने अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २३ भार चांदीचे दागिने असा ८१ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. एका पाठोपाठ झालेल्या घरफोड्यांनी परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्यामुळे चोरट्यांनी फायदा घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button